esakal | तुळजापुरात घटोत्थापन ; होमकुंडात अजाबळी अर्पण करण्यात आला
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

तुळजापुरात घटोत्थापन ; होमकुंडात अजाबळी अर्पण करण्यात आला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजाभवानीमातेला पहाटे दुधाचे अभिषेक झाल्यानंतर नित्यपूजा झाली. खीर आणि करंज्यांचा नैवेद्य दाखवून दिव्यांनी ओवाळण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास सिंदफळ येथील अजाबळी मंदिरात आणण्यात आला. त्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी पावणेबाराच्या सुमारास होमकुंडावर त्याची पूजा झाली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. तहसील कार्यालयातील जीवन वाघमारे यांच्या हस्ते अजाबळी देण्यात आला. त्यानंतर घटोत्थापन झाले.

मंदिरात यंदा अनेक पारंपरिक नैवेद्य दाखविण्यात आले. शहरासह अन्य भागातील पुरातन मंदिरे असलेल्या काळभैरव, टोळभैरव तसेच रायखेल (ता. तुळजापूर) येथील येमाई देवी यांना तुळजाभवानी देवस्थान समितीतर्फे आहेर देण्यात आले. तुळजाभवानीमाता मंदिरात सकाळच्या पूजेचे सर्व धार्मिक विधी प्रशांत संभाजीराव कदम-पाटील यांनी केले.

हेही वाचा: पालघर : जिल्हा परिषद पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाच्या ज्योती प्रशांत पाटील विजयी

आज सीमोल्लंघन

तुळजाभवानीमातेचे सीमोल्लंघन शुक्रवारी (ता.१५) पहाटे होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, मंदिरात काल दुर्गाष्टमीचा होम झाल्यानंतर छबिना मिरवणूक झाली. प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर या पूजेचे सर्व नैवेद्य महंत तुकोजी बुवा यांना देण्यात आले.

loading image
go to top