जीम चालू करा,अन्यथा घरखर्च द्या...चार दिवसांचा अल्टीमेटम 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

सांगली-  शहरात सर्व व्यापार सुरू आहेत. मात्र जिम सुरू करण्यास बंदी आहे. कर्जबाजारी झाल्याने जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा शासनाने कर्जे भागवून आमचे कुटुंब जगवावे, अशी मागणी जीम चालक, मालक, बिल्डर असोसिएशनच्यावतीने पत्रकार बैठकीत करण्यात आली. जिमच्या किल्ल्या प्रशासनाला सुपूर्द करू. चार दिवसांत शासनाने निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. 

अध्यक्ष आशुतोष कुलकर्णी, संघटक इनायत तेरदाळकर, शब्बीर कवटेवाले, विजयसिंह पाटील, श्रीकांत जयगोंड, सागर खोत, वाहीद मुलाणी आदी उपस्थित होते. 
श्री. कुलकर्णी, तेरदाळकर म्हणाले,""सुशिक्षित बेरोजगारांनी कर्जे काढून, शहरात जागा भाड्याने घेऊन जिम सुरू केल्या. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने चार महिन्यांपासून जिम बंद आहेत. त्यामुळे भाडे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. ट्रेनर, कर्मचाऱ्यांचे पगारही भागविणे मुश्‍किल झालेय. 

लॉकडाऊन शिथिल झाल्याने सर्व व्यवहार सुरू झाल्याने सोशल डिस्टन्स पाळून जिम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त, आमदार, खासदारांकडे मागणी केली आहे. खबरदारीबाबत त्यांना लेखी हमीही दिली. जिममध्ये पाच किंवा दहा व्यक्तींची बॅच तासाच्या अंतराने परवानगीची मागणी केली. पण त्यावर काही निर्णय झाला नाही. 
श्री. कवटेवाले म्हणाले,""खर्च भागवण्यासाठी काहींनी जीम विकल्या. आणखी काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.''  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turn on the gym, otherwise pay for the house . four days ultimatum