नगरमध्ये कोरोनाचा सिलसिला पुन्हा सुरू, दोनजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

TWO ANOTHER CORONA PATIENT IN NAGAR
TWO ANOTHER CORONA PATIENT IN NAGAR
Updated on: 

नगर-  गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह येत होते. त्यामुळे कोरोनाची चैन तुटली की काय असे वाटत होते. मात्र, आज पुन्हा ती सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

बाधित रुग्णापैकी एक व्यक्ती जामखेड येथील आहे. दुसरी व्यक्ती नेवासे येथील आहे. जामखेड येथील व्यक्तीचा ३ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. आज त्याचा अहवाल आला आणि तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज स्पष्ट झाले.  
जिल्ह्यात या पूर्वी २७ रूग्ण होते. त्यात दोन महिला आणि २५ पुरूषांचा सहभाग होता. परिस्थिती नियंत्रणात आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मात्र, त्याला काही तास उलटत नाही तोच दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संबंधित बाधित व्यक्ती कोणाच्या संपर्कात होता, याचाही तपास केला जाणार आहे.

दरम्यान परदेशातून पर्यटनाच्या नावाखाली भारतात प्रवेश केलेल्या परंतु दिल्लीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com