आटपाडीतील 30 टन साखर चोरीचा छडा;  दोघांना अटक, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

two arrested in 30 tonnes of sugar stolen from Atpadi
two arrested in 30 tonnes of sugar stolen from Atpadi
Updated on

सांगली ः राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्‌गुरू या साखर कारखान्यातून खरेदी केलेली साखर बिस्कीट कंपनीकडे न नेता ट्रक चालकांनी मध्येच त्यावर डल्ला मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली असून दोघांना अटक केली आहे. ट्रकसह 30 टन साखर असा 26 लाख 96 हजार 146 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अनिल शरणाप्पा माळी (वय 21) आणि विकास शिवाजी भोसले (वय 35, दोघे रा. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी की, राजेवाडी (ता. आटपाडी) श्री श्री सद्‌गुरू कारखान्यातील 30 टन साखर पुण्यातील ब्रिटानिया इंडस्ट्रीज या बिस्कीट कंपनीकडे जाणार होती. ट्रकमध्ये (एमएच 45, एएफ 4009) 9 डिसेंबर रोजी कारखान्यातून साखर भरण्यात आली. अनिल माळी आणि विकास भोसले यांनी हा ट्रक कंपनीकडे न पोहचवता वलगवडे येथे ठेवला होता. दरम्यान, याप्रकरणी पुण्यातील ट्रन्सपोर्ट चालकाने आटपाडी पोलिस ठाण्यात अपहार झाल्याची फिर्याद नोंद केली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. 

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांना या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे.

सहायक निरीक्षक रवीराज फडणीस यांना बलगवडे येथे दोघेजण ट्रकमध्ये साखर घेऊन संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. दोघा संशयितांनी साखरेची परस्पर विक्री करणार होती, अशी कबुली दिली. यानंतर दोघांनाही अटक करून त्यांच्याकडील ट्रक आणि 30 टन साखर असा 26 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

वाळूचा व्यवसाय 
संशयित अनिल माळी आणि विकास भोसले यांचा वाळूचा व्यवसाय आहे. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायातही यांचा सहभाग आहे. घटनेदिवशी अनिल माळी हा ट्रक चालवत होता. विकास भोसले याने चोरीचा कट रचला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com