
विटा : येथील ‘यू ट्यूब’ पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ व त्यांच्या सहकारी सुषमा जोशी यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी पसार दोघा संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. सागर भानुदास चोथे (वय ३७, लेंगरे रोड, विटा) व विनोद रामचंद्र सावंत (४०, सावरकरनगर, विटा) अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.