
सांगली :गावठी पिस्तूल, तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. या दोघांकडून ५० हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि तलवार असा मुद्देमाल जप्त केला. पिस्तूल बाळगणारा रोहित मच्छिंद्र माने (वय २६, करोली एम.) आणि तलवार घेऊन फिरणारा साईनाथ सुनील धुमाळ (वय ३०, मायाक्कानगर, विटा) अशी संशयितांची नावे आहेत.