दोन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
कवठेमहांकाळ : तालुक्यातील लोणारवाडी (Lonarwadi) येथे शेततळ्यात पडून दोन बालकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी (ता. ६) सायंकाळच्या दरम्यान उघडकीस आला. संकेत विलास बजबळे (वय ५), श्रद्धा सिद्धनाथ बजबळे (वय ६, दोघे रा. लोणारवाडी) अशी मृत बालकांची नावे आहेत. घटनास्थळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेची नोंद पोलिसांत (Kavathe Mahankal Police) झाली आहे.