बेळगाव : संकेश्वरनजीक अपघातामध्ये दोन ठार; चार जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

संकेश्वर - येथे महामार्गावर रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारीचा अपघात झाला. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. 

संकेश्वर - येथे महामार्गावर रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारीचा अपघात झाला. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. 

तायाप्पा अप्पासाहेब लिंगाेजी ( २७, रा. मड्डीगल्ली, संकेश्वर)  व किरण शंकर सुतार ( ३३, रा. तहसीलदार गल्ली, संकेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  हेब्बाळ (ता. हुकेरी) येथून संकेश्वरकडे मोटार (क्र. एम एच १२ डी ई  ४८५७ ) गाडी जात होती.  हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यानजीक आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी झाडावर जाऊन आदळली. यामध्ये तायाप्पा अप्पासाहेब लिंगाेजी हा जागीच ठार झाला. तर किरण शंकर सुतार याचे पहाटे उपचारा दरम्यान निधन झाले. त्याला उपचारासाठी गडहिग्लज येथे दाखल केले होते. 

अन्य जखमींची नावे अशी - प्रवीण नारायण बेनकट्टी (३३),  सुनील शिवानंद कांबळे (२५), अमित रामचंद्र खटावकर (३१), गजानन पराप्पा कुट्रे (२९) .

मृत लिंगोजी यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे, तर सुतार यांच्यामागे मोठा भाऊ व बहिण असा परिवार आहे.

लिंगोजी हे मूर्ती काम करीत असत. गणेश चतुर्थीच्या काळात गणेशमूर्ती तयार करणे व इतर वेळी फुलांचे हार तयार करण्याचा व्यवसाय ते करत. गेल्यावर्षी त्यांचा विवाह झाला होता तर पंधरा दिवसांपूर्वी त्यांना मुलगा झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Dead in accident near Sankeshwar in Belgaum