दोन मृत्यू, दोन हॉस्पिटल; हलगर्जीपणा कुणी केला?

Two deaths, two hospitals; Who did the negligence?
Two deaths, two hospitals; Who did the negligence?

सांगली ः कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मिरज आणि मुंबई येथे झालेल्या दोन मृत्यू आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने घेतलेली भूमिका याचा संबंध जोडून पाहिला असता काही धक्कादायक प्रकार समोर येतात. मिरज रुग्णालयात घेतलेली अतिशय कडक भूमिका आणि मुंबईतील रुग्णालयाने अशाच प्रकरणात दाखवलेला हलगर्जीपणा हा चर्चेचा विषय आहे.

यातील घटना पहिली... मिरजेतील कोरोना रुग्णालयातील. उदगाव (ता. मिरज) येथील 65 वर्षे वयाच्या एका महिलेला अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. तिला तत्काळ सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे प्राथमिक तपासणी केली आणि तत्काळ पुढे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सध्याचा कोरोना रुग्णालयात नेण्यास सांगितले गेले. नातेवाईकांनी तडक मिरज गाठले. तेथे गतीने उपचारासाठी प्रयत्न केले. केसपेपर तयार झाला, रुग्णाला आत घेतले आणि काही क्षणात प्राणज्योत मालवली.

नातेवाईकांना मृतदेह लगेच ताब्यात घेऊन जातो, अशी भूमिका घेतली. रुग्णालय प्रशासन मात्र कडक भूमिका घेत शवविच्छेदनावर ठाम राहिले. अगदी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून माहिती घेतली. डॉक्‍टरांनी त्यांनाही समजावले की या महिलेची कोरोना तपासणी आणि शवविच्छेदन गरजेचे आहे. तोवर मृतदेह ताब्यात देता येणार नाही. श्री. यड्रावकर यांनी नातेवाईकांची समजूत घातली. तब्बल 24 तासांहून अधिक काळ मृतदेह रुग्णालयात राहिला. ती कोरोनाबाधित नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला.

दुसरीकडे मुंबईत मृत्यू झालेल्या खेराडेवांगी येथील तरुणाबाबत बरोबर उलटी स्थिती आहे. त्याचा शनिवारी मृत्यू झाला. त्याचा स्वॅब तपासणी करण्यासाठी घेण्यात आला आणि लगेच मृतदेह ताब्यात दिला गेला. पाच दिवसांनी त्याचा अहवाल आला आणि तो आता कोरोना बाधित होता, हे स्पष्ट झाले. मुंबईतील खासगी रुग्णालयाने हा हलगर्जीपणा का केला, याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

कारण, ती साखळी आणि थेट सांगली जिल्ह्यात येऊन पोहोचली आहे. त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या 30 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचा मृतदेह तेथेच ठेवला असता किंवा मुंबईत अंत्यसंस्कार झाले असते तर ही वेळ आली नसती. परंतु, साऱ्याच पातळीवर अत्यंत दुर्लक्ष करण्यात आले आणि त्याचा परिणाम आता सहन करावा लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com