आष्टा- इस्लामपूर रस्त्यावर ट्रॅक्‍टर-ट्रक अपघातात दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आष्टा  येथे काल मध्यरात्री ट्रॅक्‍टर आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. ट्रक चालक लक्ष्मण मारुती औताडे (वय 50, माळेवाडी, ता. आटपाडी) व वाहक सचिन भानुदास घाडगे (वय 38, यरमरकरवाडी, ता. मेढा, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. 

आष्टा : येथे काल मध्यरात्री ट्रॅक्‍टर आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. ट्रक चालक लक्ष्मण मारुती औताडे (वय 50, माळेवाडी, ता. आटपाडी) व वाहक सचिन भानुदास घाडगे (वय 38, यरमरकरवाडी, ता. मेढा, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. 

आष्टा - इस्लामपूर रस्त्यावर शिंदे मळ्याजवळ हॉटेल आष्टा टाऊनसमोर दोन्ही वाहनात समोरासमोर धडक झाली. जागीच ठार झाले. बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. ट्रॅक्‍टर चालक तुषार अशोक जाधव (इस्लामपूर) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात वर्दी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जाधव इस्लामपूरकडून ट्रॅक्‍टर (एमएच 10- 1614) घेऊन भरधाव वेगाने इस्लामपूरकडून सर्वोदय करखान्याकडे निघाले होते.

ट्रॅक्‍टर शिंदे मळ्यानजीक आला असता आष्ट्याकडून इस्लामपूरकडे निघालेल्या ट्रक समोरूनने धडक दिली. त्यात ट्रॅक्‍टर आडवा झाल्याने मोठ्या चाकाला धडक बसली. ट्रॅक्‍टरचे हूड तोडून ट्रक पुढे गेला. ट्रकने ट्रॅक्‍टरच्या पुढील ट्रॉलीला धडक दिली. त्यात ट्रेलरची चार चाके तुटून पडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याकडेच्या रानात गेला. ट्रक भरधाव असल्याने केबिनपर्यंत चक्काचूर झाला. गंभीर माराने ट्रकचालक औताडे व सचिन घाडगे यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्‍टर चालकाने पळ काढला.

पहाटे अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. आष्ट्याचे पथक घटनास्थळी आले. ट्रक केबिनमधून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात अडचण येत होती. पोलिसांनी ट्रकवरील क्रमांकावरून मालकाशी संपर्क साधला. चालक व वाहकांची नावे घेतली. 

दरम्यान, रुग्णवाहिका चालक दीपक डिसले यांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. खिश्‍यातील पत्त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. दुपारी चार वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी ट्रॅक्‍टर चालकाचा शोध घेतला. रात्री दहा वाजता ट्रॅक्‍टरचालक तुषार जाधवने वर्दी दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two died in tractor-truck accident on Ashta-Islampur road