दोन्ही बंधूंनी कामाशिवाय मिळालेल्या वेळेचा उपयोग करत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली.
शिराळा : रेड (ता. शिराळा) येथे नोकरी-व्यवसाय सांभाळत वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत उच्चशिक्षित असणाऱ्या दोन युवकांनी फोंड्या माळावर एक एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit), पपई शेतीसह कुक्कुट-शेळीपालन अशा शेती, शेतीपूरक व्यवसायात प्रवेश करून यशस्वी शेतकरी-उद्योजक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे.