बागणीतील दोन शाळा बनणार 'मॉडेल स्कूल' 

अमोल पवार 
Friday, 29 January 2021

प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली अंतर्गत जिल्हा मॉडेल स्कूल आराखड्यामध्ये येथील जिल्हा प्राथमिक शाळा 1 व 2 ची मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्‍यातील 195 शाळांपैकी केवळ 9 शाळा निवडल्या आहेत. यात बागणीतील दोन शाळांनी स्थान पटकावले आहे. 

बागणी : प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली अंतर्गत जिल्हा मॉडेल स्कूल आराखड्यामध्ये येथील जिल्हा प्राथमिक शाळा 1 व 2 ची मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्‍यातील 195 शाळांपैकी केवळ 9 शाळा निवडल्या आहेत. यात बागणीतील दोन शाळांनी स्थान पटकावले आहे. 

या मॉडेल स्कूल अंतर्गत शाळेत नाविन्यपूर्ण ज्ञबदल यामध्ये होणार असून, यासाठी लागणार निधी हा जिल्हा परिषद स्तर, 15 वा वित्त आयोग, जलजिवन विभाग, मनरेगा विभाग, क्रिडा विभाग व लोकसहभाग निधीतून होणार आहे. या बदलाबरोबर विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी इ-लर्निंग च्या संकल्पनेतून विद्यार्थांना संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्ट फोन इत्यादी शैक्षणिक सुविधा यामध्ये देण्यात येणार आहेत. निवड केलेल्या शाळेमधील विद्यार्थांची शैक्षणिक, बौध्दिक, गायन, क्रिडा, लेखन, भाषण, अभिनय अशा अन्य विषयामध्ये प्रावीण्य घडवण्यासाठी या शाळा मॉर्डन टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे. 

सन 2015-16 मध्ये शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त केले असून सन 2021 मध्ये प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेची मॉर्डन स्कूल मध्ये निवड झाल्याने शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक गोपीनाथ आडके,शाळा नंबर 2 च्या मुख्याध्यापिका शोभा लोखंडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप वंजाळे, शिक्षक शैकत माब्री, सोनिया रोकडे, सुरेश माळी, निता माने, उमेश कुबडे यांचे ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे. 

वाळव्यातील 9 शाळांचा समावेश 
"वाळवा तालुक्‍यातील मॉर्डन स्कूल म्हणून पहिल्या टप्प्यात बागणी 1 व 2,कामेरी 1 व 2,कासेगाव 1 व 2,भडकंबे, कुडंलवाडी उर्दू शाळा, आणि महादेव वाडी इत्यादी जिल्हा परिषद शाळेचा समावेश करण्यात आला आहे" 

15 वित्त आयोगाच्या माध्यमातून शाळेला सरंक्षक भिंत व लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेतील माजी विद्यार्थी, गावातील युवक मंडळे, सेवाभावी संस्थांना लोकवर्गणीसाठी पुढाकार घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे अहवान करणार आहोत. 
- संतोष घनवट, सरपंच, ग्रामपंचायत, बागणी

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two garden schools to become 'model schools'