वांगीत उपसरपंच निवडीसाठी कॉंग्रेसचमध्ये दोन गट... 26 रोजी निवड 

रवींद्र मोहिते
Monday, 24 August 2020

वांगी (सांगली)- कडेगांव तालुक्‍यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वांगीत उपसरपंच निवडीबद्दल प्रचंड उलथापालथी सुरु आहेत. यातून कॉंग्रेसअंतर्गत आपआपला गट बळकट करण्याचा खेळ खेळला जात आहे. परिणामी सदस्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. 

वांगी (सांगली)- कडेगांव तालुक्‍यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वांगीत उपसरपंच निवडीबद्दल प्रचंड उलथापालथी सुरु आहेत. यातून कॉंग्रेसअंतर्गत आपआपला गट बळकट करण्याचा खेळ खेळला जात आहे. परिणामी सदस्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. 

अडिच वर्षापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत कॉंग्रेसचे डॉ. विजय होनमाने हे लोकनियूक्त सरपंच व 17 पैकी तब्बल 15 सदस्य निवडून गावावर कॉंग्रेसने एकहाती सत्ता संपादन केली होती. मात्र पहिल्यापासून उपसरपंच पदाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. दरवेळी गटबाजीला उधाण येतेच. त्यातूनच राहुल साळुंखे, बाबासो सुर्यवंशी आणि यशवंत कांबळे यांनी बाजी मारली होती. अवघ्या सहा महिन्यात यशवंत कांबळे यांनी राजीनामा दिल्याने परवा (बुधवार दि.26 ऑगस्ट रोजी) नूतन उपसरपंच निवड होणार आहे.

यामध्ये विद्या प्रशांत पाटणकर आणि मनिषा राजेंद्र पाटील यांचेकडून प्रबळ दावा केला जात असून त्यादृष्टीने आवश्‍यक सदस्य आपल्याकडे खेचण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे केवळ एक सदस्य उरला आहे.तर कॉंग्रेसकडे 16 सदस्य आहेत, त्यामुळे कॉंग्रेसमधील गावपातळीवरील लहानसहान गटांत एकमेकांची जिरविण्यासाठी चक्रव्यूह आखले जात आहे. कुणीही झाले तरी आपलाच उपसरपंच होणार आहे त्यामुळे वरीष्ठ नेते निश्‍चिंत आहेत.व सदर विषय गावपातळीवरच सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two groups in the Congress for the election of Deputy sarpanch in Wangi.