Miraj Crime : करोली एममध्ये दोन गटांत हाणामारी; पोलिसांत परस्परविरोधात तक्रारी दाखल

Crime News: मंगळवारी सायंकाळी महेश हे गल्लीतील लोकांशी बोलत थांबले असताना संशयित श्रीकांत चव्हाण तिथे आला व त्याने दारू व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती का? दिली महणून वैरणीच्या सपाट कोयत्याने मारहाण केली.
Miraj Crime News
Violence erupts between two groups in Karoli MSakal
Updated on

मिरज : करोली (एम) ता. मिरज) येथे दारू व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारीचा प्रकार घडला. यात एकास कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या गटानेही मारहाण करण्यात आली अशी फिर्याद पोलिसांत दिली. त्यानुसार दोन्ही गटांच्या वतीने परस्पराविरोधी फिर्यादी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com