
सांगली : माधवनगर येथील रविवार पेठ येथे पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटांत काठी, कुऱ्हाडीने राडा झाला. यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संदीप शामराव वायदंडे (वय ४०) आणि प्रकाश किसन आवळे (वय ४२) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली असून, दोन्ही गटांतील पंधरा जणांवर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.