द्राक्ष उत्पादकांना दोनशे कोटींचा फटका 

 Two hundred crores loss to grape growers in Sangali
Two hundred crores loss to grape growers in Sangali
Updated on

सांगली ः जगाला विळखा घातलेल्या कोरोनावर बचावासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यादिवशी जिल्ह्यात 9 हजार एकरांवर द्राक्ष शिल्लक होती. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली. जगभरात निर्यात होणाऱ्या द्राक्षाला ब्रेक लागला. परिणामी प्रतीएकरी स्थावर मालमत्ता सोडून प्रतीएकरी दीड-दोन लाख खर्चून आणलेली द्राक्ष शेतकऱ्यांसाठी कडू झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान खर्चाच्या हिशेबाने 180 ते 200 कोटींहून अधिक फटका बसला आहे. त्यात वीस टक्के निर्यातक्षम द्राक्षाचाही समावेश आहे. 

शेतकरी द्राक्षाची बेदाण्याकडे वळला तरी गुणवत्तेचा प्रश्‍न कायम आहे. आभाळच फाटलंय. ते सांधायचं कस्स, या विवंचनेत शेतकरी आहेत. अगदी बेदाणा केली तरी एकरी दीड लाखाचा घाटा कमी होण्याची चिन्हे नाहीत. गेल्या वीस दिवसांत 3 हजार एकरांवरील द्राक्ष बेदाण्याला तर किरकोळ विक्री झाली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षाही फोल ठरेल, असे सध्याचे चित्र आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर शेती, शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसायासमोरील समस्या वाढताहेत. लॉकडाऊनचा मोठा परिणाम द्राक्ष शेतकऱ्यांवर झाला आहे. सरकारने शेतीमालाची वाहतूक लॉकडाऊनमधून वगळली आहे. प्रत्यक्षात मात्र द्राक्ष, फळे, भाजीपाला, पशुखाद्य, चारा व धान्य वाहतुकीमध्ये शेतकऱ्यांना अडचणीचा पाढा कायम आहे. वाहतूक परवाना पद्धत सोपी असूनही अंमलबजावणी जटिल होत आहेत. संसर्गाच्या भीतीने खासगी वाहनचालक मालाची वाहतुकीसाठी राजी होत नाहीत. मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे शेतमाल शेतात पडून राहण्याचा वेळ आली आहे. 

दर कोसळले... 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डोळ्यादेखत बागा मातीमोल होतानाचे चित्र डोळ्यासमोर आहे. द्राक्ष बागांसाठी स्थावर खर्च वगळता औषध, मजुरी, मशागतीसाठी प्रती एकर किमान दीड ते दोन लाख खर्च केले आहेत. द्राक्षाचा उत्पादन खर्च किलोला 20 रुपयांपेक्षा अधिक आहे. अशावेळी त्यांना सध्या 12-15 रुपयांनी द्राक्षाची मागणी केली जात आहे. अन्‌ अशा परस्थितीत बळेच माल विकावा लागतोय. हे चित्र भयानक विदारक आहे. 

बेदाणा शेड फुल्ल 
शेतकरी बेदाण्याकडे वळत असताना एकाच वेळी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेदाणे शेडही उपलब्ध नाहीत. सांगली-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर जुनैनी, आगळगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर शेड आहेत. ती सध्या हाऊसफुल आहेत. अद्यापही जिल्ह्यात 6 हजार 300 एकरांवर द्राक्ष वेलीवर माल तयार आहे. त्यांचे काय करायचे असा प्रश्‍नच आहे. या शिवाय आवश्‍यक असलेला डिपिंग ऑईलचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. 

उधारी, कर्जे भागवायची कशी... 
शेतकी वर्षभर दुकानदारांकडून उधारीवर औषधांची खरेदी करतो. शिवाय पीककर्जेही घेतो. सरकारने पीक कर्जाला सवलत दिली तरी औषध दुकानदारांकडून तगादा लावायला सुरवात झालेली आहे. एकरी दीड-दोन लाखाची उधारी असते. आणि बागेच्या जीवावर वर्षभरात चार-पाच लाखांचे देणे करून ठेवलेले असते. ते कसे भागवायचे या विवंचनेत शेतकरी आहेत. खासगी देणी वेळेत भागवली नाहीत तर महिन्याला अडीच-तीन टक्के मोजावे लागण्याची भीती आहे. 

पुढील हंगामाची चिंता... 

द्राक्ष बागा रिकाम्या व्हायच्या आहेत. तोवरच एप्रिल छाटण्या सुरू झालेल्या आहेत. किमान पंधरवड्याची विश्रांती घेऊन पुढील तयारी गरजेची असते. त्यासाठी खते, मजुरी आणि अन्य खर्चासाठी पैसे उपलब्धतेची शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे. कर्जमाफी आणि कोरोनामुळे वित्तीय संस्थांनीही हात आकडते घेतले आहेत. ही वेगळीच चिंता आहे. शिवाय छाटणीसाठी लागणारे हायड्रोजन सायनामाईड पेस्टच्या कमतरतेमुळे द्राक्ष वेली फुटण्यासाठीही जादा प्रयत्न करावे लागणार आहेत. 

मार्ग काढण्याशिवाय गत्यंतरच नाही

यंदा द्राक्ष शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यातून मार्ग काढण्याशिवाय गत्यंतरच नाही. खचून न जाता संघर्ष करीत आलेल्या परिस्थितीशी तोड देण्याशिवाय पर्यायच नाही. डगमगून न जाता शिल्लक मालाचा बेदाणा आणि भविष्यात कमी खर्चात शेती करावी लागेल. त्यासाठी स्वानुभव पणाला लावा. कोणी सांगतोय म्हणून अतिरेक करू नका.' 
- सुभाष आर्वे, द्राक्ष अभ्यासक व द्राक्ष संघाचे माजी अध्यक्ष, सांगली. 

आठवड्यात परिस्थिती पूर्व पदावर
कोरोना पार्श्‍वभूमीवर द्राक्ष उत्पादकांच्या फटका बसतोय. तरीही जेवढे शक्‍य आहे त्यासाठी त्यांच्या मदतीसाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत. गेल्या तीन आठवड्यांत सव्वानऊ हजार एकरांतील तीन हजार वरील माल बेदाणा आणि किरकोळ विक्री झाली. भविष्यात बेदाण्याला पर्याय नाही. याचा अर्थ आमचे निर्यातीचे प्रयत्न सुरुच आहेत. बेदाण्यासाठी डिपिंग ऑईल, खरड छाटणीसाठी डॉरमॅक्‍स उपलब्ध करून देत आहे. येत्या आठवड्यात दोन्हीबाबत परिस्थिती पूर्व पदावर येईल.' 
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com