सांगलीत पावणे दोनशे दुचाकीस्वारांवर कारवाई 

PHOTO-2020-04-01-14-13-55.jpg
PHOTO-2020-04-01-14-13-55.jpg

सांगली : संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज दुसऱ्या दिवशी सुमारे पावणे दोनशे दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर आणि ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. 

सांगली जिल्ह्यात "कोरोना' चे आतापर्यंत 25 रुग्ण आढळून आलेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय केलेत. महापालिका क्षेत्रात अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी आता सक्त कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार काल पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कालच दोनशे दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. आजही सकाळपासून कारवाई करण्यात आली. सुमारे पावणे दोनशे दुचाकींवर कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी सात ते नऊ या कालावधीत पोलिसांनी विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर ही कारवाई केली. 


शहर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली 75 जणांवर कारवाई करण्यात आली. संजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 18, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 16 कारवाई करण्यात आल्या. विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 65 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणावर करण्यात येणार आहे. 
 

""कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. काही दुचाकीस्वार सकाळी किराणा भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. घराजवळच सर्व व्यवस्था केली असताना रस्त्यावर फिरण्याचे कारण नाही. त्यामुळे अशांवर कारवाई केली जात आहे.'' 

-अशोक वीरकर, पोलिस उपाधीक्षक 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com