टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार...पलूस तालुक्‍यात अपघात 

संजय गणेशकर 
Sunday, 19 July 2020

पलूस (सांगली)- सांडगेवाडी येथील मोराळे फाटा (जूना सातारा रोड, लक्ष्मी चौक) येथे दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मोराळे (ता. पलूस) कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील सदाशिव शिवाजी मोटकट्टे (वय 24) व मच्छिंद्र विश्वनाथ सव्वाशे (वय 32, दोघेही रा. मोराळे ) हे दोघे तरूण ठार झाले. हा अपघात सकाळी 7 वाजता झाला. याबाबत टेम्पो चालकाविरूध्द पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जूना सातारा रोड, मोराळे फाटा, लक्ष्मी चौक येथे बांबवडेच्या दिशेने कडेगावकडे भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाचा दूध टेम्पो निघाला होता. दरम्यान सदाशिव मोटकट्टे व मच्छिंद्र सव्वासे हे आपल्या दुचाकीवरून पलूसच्या दिशेने निघाले होते. टेम्पोने मोराळे येथून पलूसकडे येणाऱ्या मोटकट्टे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील सदाशिव मोटकट्टे व मच्छिंद्र सव्वाशे हे दोघे युवक रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागून गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन झालेनंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. मोराळेतील दोघा तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. तसेच मोराळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघाताबाबत महादेव शिवाजी मोटकट्टे (वय 30, रा. मोराळे) यांनी चालक महादेव दत्तात्रय विभूते ( वय 36) रा. ब्रह्मनाळ याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पलूस पोलीस अधिक तपास आहेत. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed on a two-wheeler in a collision with a tempo . Accident in Palus taluka