महापूर पार्श्‍वभूमिवर सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल

विष्णू मोहिते
Thursday, 6 August 2020

सांगली ः महापूराच्या पार्श्‍वभूमिवर राज्य सरकारने यंदा जय्यत तयारी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापूर बांधित जिल्ह्यात कोरोनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्व दिलेले आहे. सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. त्यातील एक टीम सांगली शहरात तर दुसरी टीम आष्टा ( ता. वाळवा) येथे तैनात ठेवलेली आहे. 

सांगली ः महापूराच्या पार्श्‍वभूमिवर राज्य सरकारने यंदा जय्यत तयारी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापूर बांधित जिल्ह्यात कोरोनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्व दिलेले आहे. सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. त्यातील एक टीम सांगली शहरात तर दुसरी टीम आष्टा ( ता. वाळवा) येथे तैनात ठेवलेली आहे. 

राज्य सरकारने यंदा महापूराची मोठी काळजी घेतलेली आहे. गेल्या चार दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला आहे. चांदोली धरण परिसरातही सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी होत आहे. चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिली तर कोयना धरणातून आज सायंकाळपासून दोन ते 5 हजार क्‍युसेकने विसर्ग केला जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले आहे. दरम्यान, चांदोली धरण परिसरात आज तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी आठ वाजेपर्यंत 165 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 10 फुटावरुन 22 फुटापर्यंत वाढली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन टीम दाखल झाल्या आहेत. 

पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कोयना परिसरात गेल्या 24 तासात 202 मिलिमिटर पाऊस पडला. महाबळेश्‍वरला 183 आणि नवजाला 235 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात 81 हजार 64 क्‍युसेक पाणी गोळा झाले आहे. कृष्णेची विविध ठिकाणची पाणीपातळी अशी आहे.

नद्यांची पाणीपातळी पुढीप्रमाणे आहे. कोयना कराड 24.09 फूट, कृष्णा 16.3, बहे 9.5, ताकारी 24.9, भिलवडी 23, आयर्विन सांगली 22, अंकली 24.8 आणि म्हैसाळ बंधारा 32 फूट. 

नद्यांच्या पाणीपातळीत होणारी एक वाढ, पावसाच्या पार्श्‍वभूमिवर दोन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात 16 टीम सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये मुंबई 5, कोल्हापूर 4, सांगली 2 , सातारा 1, ठाणे 1, पालघर 1 , नागपूर 1, रायगड 1 अशा एकूण 16 एनडीआरएफ च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 
........................... 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two NDRF teams arrive in Sangli district on the backdrop of floods