esakal | साताऱ्यात आकड्यांचा थरकाप 27 नवे बाधित, दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona satara

गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 244 रुग्णांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे, तर 184 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्यापही 453 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

साताऱ्यात आकड्यांचा थरकाप 27 नवे बाधित, दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आज त्यात आणखी 27 बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा संख्या 336 झाली. बाधितांचा आकडा वाढत असतानाच साताऱ्यात उपचार सुरू असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही वाई तालुक्‍यातील आहेत. कोरोनाबाधित मृतांचा आकडा नऊवर गेला आहे. 

गेल्या 24  तासांत 244 जणांना उपचारासाठी जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात दाखल करण्यात करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल शंभरने वाढली. त्यामुळे त्यांच्या जवळच्या संपर्कातील शोधणे, त्यांना क्वारंटाइन करणे व अन्य उपाययोजना राबविण्यात प्रशासनाची दमछाक होत आहे. आज सायंकाळपर्यंत कोणीही कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला नव्हता. मात्र; रात्री पावणेदहा वाजता 27 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाई तालुक्यातील अकरा, जावळी तालुक्यातील सहा, महाबळेश्वर दोन, पाटण दोन, कऱ्हाड तालुक्यातील एका
रूग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आसले (ता. वाई) येथील 70 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक मुंबईहून प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कात आलेला एक जण कोरोनाबाधित निघाला. त्यामुळे त्यांच्याही घशाच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. काल (ता. 24) त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रात्री त्यांची प्रकृती अचानक खराब झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.

जांभळी (ता. वाई) येथील 52 वर्षीय पुरुषाचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मुंबईवरून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना काल उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यातच दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा त्यांच्याही अहवाल पॉझिटिव्ह आला.

या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णाच्या नियमावलीनुसार संगममाहुली येथे दोन्ही मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचाही मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे रात्री आलेल्या अहवाला मुळे स्पष्ट झाले. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 244 रुग्णांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे, तर 184 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्यापही 453 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

ज्येष्ठ महिलेसह युवक कोरोनामुक्त 
जिल्ह्यात आज दोघांचा मृत्यू झाला असला, तरी दोघांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यामध्ये 75 वर्षीय महिला व 24 वर्षांच्या युवकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातून बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या 122 झाली आहे. कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून या दोन्ही रुग्णांना टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. 

जिल्ह्यात एक लाख लोकांची वापसी 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेश, राज्याच्या इतर जिल्ह्यातून कालपर्यंत (ता. 24) ई-पास घेऊन एक लाख नऊ हजार 604 नागरिकांनी चेक पोस्टवरून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, तामीळनाडू, तेलंगणा, पंजाब, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियानामधून 2,184 नागरिकांनी प्रवेश केला आहे.

1,07,420 नागरिक हे इतर जिल्ह्यातून आलेत. सातारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी ः कऱ्हाड- 12671, कोरेगाव- 6113, खंडाळा- 4804, खटाव- 11676, जावळी- 8192, पाटण- 12463, फलटण- 7457, महाबळेश्वर- 6588, माण- 10341, वाई- 8985, सातारा- 20314. 

loading image