धाकधुक ः दुबईहून आलेल्या कोपरगावच्या दोघांना नगरला हलवलं

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

या बाराही जणांना घरी सोडून देण्यात आले अाहे. त्यांना होम  क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोपरगाव : तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू चालू असतानाच आज सकाळी आणखी दोन रुग्णांना सर्दी, खोकला होता. त्यामुळे त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने खबरदारी म्हणून नुकतेच नगर येथे हलविण्यात आले आहे.

दोघेही संशयित हे कोपरगाव ग्रामीण भागातील अाहेत. ते दुबई येथून गेल्या चार दिवसापूर्वी गावाकडे आले असल्याची माहिती मिळत आहे.  त्यामुळे कोपरगावमध्ये कोरोनाचा प्रवेश होतो की काय अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे.  

दरम्यान, दुबई येथून आलेल्या प्रवाशांपैकी तब्बल बारा जणांना परवा 20 डिसेंबर रोजी नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्या बाराही जणांचा कोरोना विषाणूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती डॉक्टर कृष्ण फुलसौंदर यांनी सकाळच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

या बाराही जणांना घरी सोडून देण्यात आले अाहे. त्यांना होम  क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अगोदरही दुबई येथून आलेल्या पाच जणांची तपासणी करण्यात अली होती. ते पाचही जणांची निगेटीव्ह अहवाल आले होते. मात्र, आज सकाळी नव्याने दोन ग्रामीण भागतील युवकांना नगर येथे हलविण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू आहे.

या रूग्णांना नगरला हलवलं असलं तरी लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येकाची आपापली जबाबदारी घ्यावी, असे अावाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two patients from Kopargaon were shifted to Ahmednagar