अंगणात खेळणाऱ्या दोन भावंडांचा गाडीखाली चिरडुन मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

कुर्डुवाडी (सोलापुर) : दुधाचे पिकअप मागे घेत असताना अंगणात खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांचा गाडीच्या चाकाखाली चिरडुन मृत्यू झाला. ही घटना मुंगशी ( ता माढा) आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.

कुर्डुवाडी (सोलापुर) : दुधाचे पिकअप मागे घेत असताना अंगणात खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांचा गाडीच्या चाकाखाली चिरडुन मृत्यू झाला. ही घटना मुंगशी ( ता माढा) आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.

आर्वी तात्यासाहेब काळे (वय वर्षे 3) व मुलगा देवदत्त तात्यासाहेब काळे (वय वर्ष दोन) अशी मृत्यु झालेल्या भावंडाची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार ,घराच्या बाहेर आर्वी व जय ही भावंडे घराच्या बाहेरील अंगणात खेळत होती. पिकअप मागे घेत असताना ही दोघे ही चिमुरडी गाडीच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. गावावर शोककळा पसरली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two siblings died in Accident

टॅग्स