सांगली : पाझर तलावात पडून सख्या बहिणींचा मृत्यू

सांगली : पाझर तलावात पडून सख्या बहिणींचा मृत्यू
Updated on

जत - तिप्पेहळ्ळी (ता.जत) येथील बंडगर वस्तीजवळ राहणार्‍या कोमल (वय ७) व सानिका रामा भिसे (वय १०) या दोघी सख्या बहिणीचा म्हैसाळ योजनेच्या कालव्यालगत असणार्‍या पाझर तलावात पडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आजोबा जगु भुजंगा बंडगर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोमल व सानिका यांचे आई-वडील हे तालुक्यातील खिलारवाडी  येथील रहिवासी आहेत. ते मोलमजुरी करण्यासाठी सतत परगावी असतात. त्यामुळे या दोन लहान मुलींना शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्यांच्या आईने माहेरी तिप्पेहळ्ळी येथे लहानपणापासून आई-वडिलांकडे सोडले आहे. 

आज या दोघेही घरातील जनावरे घेऊन रंगराव बिरा वाघमोडे यांच्या शेतजमिनीत चारण्यासाठी गेल्या होत्या. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यालगत पाझर तलाव असून या पाझर तलावात सुमारे दहा फूट पाणी साठा आहे. या दोन लहान बहिणी खेळत खेळत पाझर तलावातील पाण्यात गेल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. खेळत असताना पाय घसरून पाण्यात पडून बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. कोमल ही इयत्ता पहिली मध्ये तर सानिका ही इयत्ता चौथीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती.

बराच काळ या दोन लहान मुली जनावरासोबत दिसत नाहीत. म्हणून त्यांच्या मामाने पाझर तलाव परिसरात येऊन पाहिले. त्यांच्या पायातील चप्पल काठावर व त्यांचे पाय तलावातील पाण्यावर दिसले. यानंतर त्या मुलींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हावलदार प्रविण पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chandrakant Patil on Jayant Patil shaktipeeth highway
Sangli wall collapse
mistaken identity police case
Usha Pawar’s Inspirational Journey: Success in SSC Exam at the Age of Sixty
Marathi News Esakal
www.esakal.com