सापांचा खेळ करणाऱ्यांच्या तावडीतून 2 अजगरांची सुटका

Snake
Snake
Updated on

नगर : नगरजवळ एमआयडीसी भागात सापांचा खेळ करणाऱ्यांकडून दोन अजगर ताब्यात घेऊन त्यांना वनविभागाने पुन्हा निसर्गात मुक्त केले. नगरमधील सर्प पकडणारे  युसूफ खान हे एमआयडीसी भागातून कामानिमित्त जात असताना सोमवारी दुपारी त्यांना काही लोक सापांचा खेळ करताना आढळले. त्यांनी त्यांना खेळ करणे कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले. त्यावेळी त्या अज्ञात लोकांनी अजगर जागेवर सोडून पळ काढला.

सदरची बाब खान यांनी निसर्गमित्र व नेचर लव्हर्स क्लबचे पदाधिकारी मंदार साबळे यांना कळवली. साबळे यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना याबाबत माहिती देत हे  दोन्ही अजगर वन विभागाच्या ताब्यात दिले. हे दोन्ही अजगर सात ते आठ फूट लांबीचे होते. उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहायक वनसंरक्षक सुनील पाटील, रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल अनिल गावडे, वनरक्षक मुस्ताक सैय्यद, मनीष जाधव, शेखर कराळे यांनी दोन्ही अजगर संरक्षित वन क्षेत्रात मुक्त केले.

सापांचा खेळ करणे,साप जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा असून असे सापांचा खेळ करणारे किंवा साप टोपलीत घेऊन दारोदार फिरणारे आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे वनखात्याने व नेचर लव्हर्स क्लब ने आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com