
शिराळा : तालुक्यातील तीन ठिकाणी केलेल्या घरफोडीत प्रकरणी शिराळा पोलिसांनी प्रथमेश अमित जाधव (वय २४, शिराळा), करण नंदकुमार सातपुते (२६, खेड) यांना अटक केली . त्यांच्याकडून ६ लाख ३३ हजार ७६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.