
सांगली : सरत्या वर्षात एकाच दिवशी पोलिस, शिक्षक आणि लिपिक असे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. गुन्ह्यातील मदतीसाठी पोलिसाने २५ हजारांची लाच मागितली, तर महाविद्यालयातील थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षक आणि लिपिकाने १ लाख १० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे.