
Miraj City: Two women injured in stray dog attack, admitted to government hospital.
Sakal
मिरज: शहरातील मोकाट कुत्र्यांनी दोघींवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. दिंडीवेस येथील चंदा फक्रुद्दीन पठाण या जखमी झाल्या आहेत. सह्याद्री स्टार्च येथील येथील एका मुलीचाही जखमीत समावेश आहे. जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.