मोटारकारने दोन महिलांना चिरडले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

निपाणी वडगाव येथील लग्नाचे वऱ्हाड टेम्पोतून लासूर स्टेशनजवळील भानवाडी (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे चालले होते. नगर-औरंगाबाद रस्त्यावर जळके बुद्रुक शिवारात काही वेळासाठी टेम्पो थांबला. त्यावेळी टेम्पोतून उतरलेल्या वणवे व काळे या रस्ता ओलांडत असताना, त्यांना एका कारची जोरात धडक बसली.

नेवासे : नगर-औरंगाबाद रस्त्यावर जळके बुद्रुक शिवारात आज दुपारी बाराच्या सुमारास भरधाव कारची धडक बसून, दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 

ताराबाई संतोष वणवे (वय 55) व मंगल सुनील काळे (वय 46, दोघीही रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, अपघातानंतर कारसह चालक पसार झाला. याबाबत नेवासे पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

रस्ता ओलांडताना कारची धडक 
निपाणी वडगाव येथील लग्नाचे वऱ्हाड टेम्पोतून लासूर स्टेशनजवळील भानवाडी (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे चालले होते. नगर-औरंगाबाद रस्त्यावर जळके बुद्रुक शिवारात काही वेळासाठी टेम्पो थांबला. त्यावेळी टेम्पोतून उतरलेल्या वणवे व काळे या रस्ता ओलांडत असताना, त्यांना एका कारची जोरात धडक बसली. त्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने कारसह पळ काढला. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच प्रवरसंगम दूरक्षेत्राच्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी नेवासे फाटा येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याबाबात नेवासे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

वाहतूक खोळंबली 
नगर-औरंगाबाद रस्त्यावर जवळके बुद्रुक येथे अपघात झाल्यानंतर वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two women were crushed by a motor car