सीनेला दोन वर्षानंतर पूर

Two years after the flood to the Sina
Two years after the flood to the Sina

नगर :  उत्तरा नक्षत्राच्या शेवटच्या टप्यात नगर तालुक्‍याच्या उत्तर भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील जेऊर, ससेवाडी, इमामपूर, डोंगरगण, मांजरसुंबे, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता, विळद, देहरे, नगापूर, शेंडी, पोखर्डी या भागात मंगळवारी मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिमेंट बंधारे, नाला बांधात पाणी साचल्याने या भागातील विहिरी, कूपनलिकांना पाणी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. सलग तीन वर्षापासून कोरडाठाक पडलेल्या पिंपळगाव तलावात या दमदार पावसाने नव्याने पाणी येण्यास सुरवात झाली आहे.


या भागात झालेल्या पावसामुळे मध्यरात्रीनंतर सीना नदीला पूर आल्याने कल्याण रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती. सावेडी गावातून बोल्हेगावकडे, नालेगाव वारूळाचा मारूती परिसरातून निंबळककडे, जाणारी वाहतूकही बंद झाली होती. सकाळी आठच्या सुमारास पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली. या पावसामुळे ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला, दूध, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी यांना काही काळ अडकून पडावे लागले. पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी लोखंडी पूल, काटवन पूल, कल्याण रस्ता, वारुळाचा मारूती पूल या परिसरात गर्दी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक
सीना नदीच्या उगमापासून सोलापूर रस्त्यावरील दहीगाव साकतपर्यंत नदीतील अतिक्रमणे हटवल्याने या पुराचा फटका नागरी वस्तीला बसला नाही. नेहमी सीना नदीला पूर आला, की नागापूर, सावेडी, बालिकाश्रम, हाडको, नालेगाव परिसरात या पुराचे पाणी घुसायचे. मात्र आज झालेल्या जोरदार पावसाचे पाणी सीना पात्रातून दुथडी भरून वाहत होते; मात्र नागरी वस्तीला कुठेही त्याची झळ पोचली नाही. त्याचे श्रेय ही नदी प्रवाही करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांचे असल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com