
तासगाव : ‘‘सरपंच हा त्याच्या गावचा मुख्यमंत्रीच असतो, गावच्या विकासात उल्लेखनीय काम करणाऱ्या सरपंचांना ताकद देण्याची जबाबदारी महायुतीचे सरकार पार पाडेल,’’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तासगाव येथे बोलताना केले. विकासकामात राजकारण आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.