Video पहा : डॅशिंग उदयनराजेंचं हळवं रुप!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

उदयनराजेंचे बेधडक स्टाईलचे व्हिडिअाे व्हायरल झालेच आहेत परंतु सध्या त्यांचा एक व्हिडिआे मात्र तुफान व्हायरल झाला आहे. ट्विटरवर काही तासांतच सात हजार जणांनी ताे पाहिला आहे.

सातारा ः लाेकसभा पाेटनिवडणुकीत साताराचे खासदार उदयनराजे भाेसले यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले. त्यामुळेच आजही त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांची गर्दी असते. त्यांच्याकडे दररोज सुमारे 50 ते 60 नागरीक या ना त्या कारणाने भेटायला येतात. यामध्ये युवा वर्गाबरोबरच ज्येष्ठांची देखील लक्ष्णीय संख्या आहे. कोणाचे काम हाेत नसेल तर त्यांच्या स्टाईलने अडलेल्या नडलेल्यांची काम करताना दिसतात. 

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कामाची पद्धत सातारकरांसाठी विशेषतः शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नवीन नाही. एखादे काम हाेत नसेल तर नागरीक उदयनराजेंकडे धाव घेतात. ते काम हाेवू अगर नये परंतु नागरीकांना उदयनराजेंना भेटल्यानंतर दिलासा मिळताे असे नेहमी एेकावयास मिळते. सध्या उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथे नागरीकांची गर्दी असते. आपले काम झाल्यानंतर नागरीक उदयनराजेंसमवेत छायाचित्र काढण्यास उत्सुक असतात. उदयनराजेही छायाचित्रसाठी शक्यताे काेणाला नाही म्हणत नाही.

हेही वाचा -  Video : उदयनराजे सध्या काय करतात...

दरम्यान उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केलेली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड होणार असल्याच्या चर्चेस पुन्हा उधाण आले आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्री करण्यावर देखील विचारविनिमय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु दूसरीकडे उदयनराजेंनी मात्र आपल्याकडे पद असाे अथवा नसाे मी अखेरच्या श्वासापर्यंत तुमचाच राहीन. सेवा करीन असे समाजमाध्यमातून जाहीर केले आहे. त्यांच्या बेधडक स्टाईलचे व्हिडिअाे व्हायरल झालेच आहेत परंतु सध्या त्यांचा एक व्हिडिआे मात्र तुफान व्हायरल झाला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Emotional Video Viral