esakal | उदयनराजे भाजप नाहीतर 'या' पक्षात करणार प्रवेश; चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजे भाजप नाहीतर 'या' पक्षात करणार प्रवेश; चर्चांना उधाण

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच उदयनराजे राष्ट्रवादीसोबतच भाजपचीही चिंता वाढवली आहे. आता उदयनराजे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

उदयनराजे भाजप नाहीतर 'या' पक्षात करणार प्रवेश; चर्चांना उधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा :  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच उदयनराजे राष्ट्रवादीसोबतच भाजपचीही चिंता वाढवली आहे. आता उदयनराजे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित असताना ही जागा शिवसेनेच्या कोट्यात असल्याने उदयनराजेंच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्यांच्या चर्चांनी जास्त जोर धरला आहेत. तसेच, उदयनराजे भोसले यांची नुकतीच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. त्यामुळे उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे. वरुण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. 

उदयनराजे विषयींच्या चर्चा सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत सोशल मीडियावर थांबण्याचे नाव घेत नाहीत. कारण, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, असे आता सांगण्यात येत असतानाच 'मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं असे वाटतंय म्हणत, उदयनराजे यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली होती.

loading image
go to top