esakal | उद्धव ठाकरेंचे आगमनाने महाबळेश्वरकरांच्या जून्या आठवणी ताज्या
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंचे आगमनाने महाबळेश्वरकरांच्या जून्या आठवणी ताज्या

आमदार भास्कर जाधव यांच्या कुटूंबातील लग्नाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वरात आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच येथे आल्याने स्थानिक शिवसैनिकांसह पर्यटक व स्थानिक नागरिकांची त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

उद्धव ठाकरेंचे आगमनाने महाबळेश्वरकरांच्या जून्या आठवणी ताज्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज (शुक्रवार) येथील वेण्णा लेक वरील हेलीपॅडवर सहकुटुंब आगमन झाले. वेण्णा लेक येथून मुख्यमंत्री ठाकरे ताफ्यासह राजभवन येथे मुक्कामासाठी गेले. राजभवन परिसरात मोठा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

श्री. ठाकरे हे एका लग्नाच्या निमित्ताने येथे खाजगी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी महाबळेश्वरचे प्रवेशद्वार असलेल्या वेण्णालेक परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. गोंधळलेल्या प्रशासनामुळे हेलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना गोंधळ उडाला. ठराविक मान्यवरांना हेलीपॅडच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता तरी देखील स्वागत करताना गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

महाबळेश्वर हे (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते ठिकाण होते. बाळासाहेबांनी उध्दव ठाकरे यांना आपला उत्तराधिकारी म्हणून सेना प्रमुखाची सुत्रे देखील महाबळेश्वरमध्येच सोपविली होती. ही आठवण आज पुन्हा महाबळेश्वरकरांमध्ये ताजी झाली. उध्दव व त्यांचे चिरंजीव आदित्य यांचे देखील महाबळेश्वर बाबत विशेष प्रेम आहे. वर्षातून दोन वेळा ते महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येत असतात. यावेळी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह महाबळेश्वरात आले आहेत. 

आमदार भास्कर जाधव यांच्या कुटूंबातील लग्नाच्या निमित्ताने ठाकरे हे खाजगी दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे महाबळेश्वरकरांना मुख्यमंत्री कोणती अनोखी भेट देतील याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे महाबळेश्वरकरांचे मात्र नुकसान झाले आहे. शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वेण्णालेक परिसरात हेलीपॅड केल्याने महाबळेश्वरच्या प्रवेशद्वारच पर्यटकांसाठी बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. तसेच आज (शुक्रवार) संपुर्ण दिवस येथील पालिकेचे बोट क्लब सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावे लागल्याने पर्यटक नाराज झाले. सोबत पालिकेचे देखील एक दिवसाच्या उत्पन्न बुडले. 

हेही वाचा - Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आगमनावेळीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदर मकंरद पाटील, बाळासाहेब भिलारे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य वनसरक्षक भगतसिंह हाडा, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस अप्पर उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक अजित टिके, आमदार भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, मिलिंद नार्वेकर व महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिदे, वाई प्रांत अधिकारी संगीता चौगुले, महाबळेश्वर तहसिलदार सुषमा पाटील, महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, उपाध्यक्ष अफझल सुतार उपस्थित हाेते.

एक जूनी आठवण
 

आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचे लग्न उद्या (शनिवार) हॉटेल किज येथे आहे. हेच ते हॉटेल आहे सन 2017 मध्ये उध्दव ठाकरेंना मोठ्या आवाजात ध्वनीक्षेप लावल्याने त्रास झाला होता. त्यावेळी या हॉटेलवर कारवाई झाली होती. काही काळ हे हाॅटेल बंद पाडण्यात आले होते.
 

loading image