उज्जीवन स्मॉल फायनान्स  बॅंकेची महिलेकडून फसवणूक...12 महिलांची तीन लाखाची रक्कम परस्पर हडप 

crime.jpg
crime.jpg

सांगली-  येथील उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेत कर्ज मंजुरीसाठी मुळ कागदपत्रातील महिलांऐवजी 12 बनावट महिलांना उभे करून कर्जाची रक्कम स्वत:कडे ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकेची 2 लाख 93 हजार रूपयांना फसवणूक केल्याप्रकरणी शाहीन समीर पटेल ऊर्फ शाहीन सलीम सय्यद (रा. अष्टविनायकनगर, जागृती डीएड कॉलेजजवळ, कुपवाड रस्ता) या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संदीप राजाराम गवळी (वय 36, गुरूवार पेठ, तेली गल्ली, मिरज, सध्या रा. विश्रामबाग) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत कार्यालय असलेल्या उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेमार्फत महिलांना छोट्या उद्योगासाठी कर्ज पुरवठा केला जातो. बॅंकेशी संबंधित असलेल्या शाहीन पटेल यांनी कर्ज मिळवून देतो असे परिसरात ओळख निर्माण केली होती. जुलै 2018 मध्ये अष्टविनायकनगर येथील गायत्री कोळी, सविता देसाई, भाग्यश्री कांबळे, शर्मिला शर्मा, जयश्री भंडारे, हर्षदा कदम, मुमताज म्हैसाळे, रेखा शितोळे, सुरेखा माने, पद्मिनी कोळी, चांदबी सोलापुरे, श्रीदेवी कुंभार (सर्व रा. अष्टविनायकनगर) यांची बनावट कागदपत्रे बॅंकेत कर्जप्रकरणासाठी सादर केली. 

बॅंकेच्या पडताळणीवेळी कागदपत्रे सादर केलेल्या महिलांऐवजी सुवर्णा आठवले, भाग्यश्री तोडकर, संध्या सरवदे, गंगुबाई गडदे, रेखा यादव, लैला शेख, अनिता कांबळे या नावाच्या बनावट महिलांना उभे केले. त्यानंतर बॅंकेने कर्जापोटी दिलेली 2 लाख 93 हजार रूपये रक्कम स्वत:कडे ठेवली. तसेच ती रक्कम वापरून बॅंकेची फसवणूक केली. बॅंकेने कर्जाचे हप्ते थकीत झाल्यानंतर चौकशी केली, तेव्हा बनावटगिरी उघडकीस आली. जुलै 2018 ते ऑक्‍टोबर 2018 या दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर शाहीन पटेल हिच्याकडून रक्कम जमा न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. 
फसवणुकीबद्दल आश्‍चर्य- 
एका महिलेने 12 महिलांची बनावट कागदपत्रे गोळा करून त्यांच्या नावाने बनावट महिला उभे करून कर्जाची रक्कम स्वत:कडे घेऊन सहजच बॅंकेची फसवणूक केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com