'संभाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

कोल्हापूर - "छत्रपती संभाजीराजे यांना अनेक दुर्दैवी प्रसंगांशी सामना करावा लागला, तरीही हा राजा पराक्रमी होता. त्यांच्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी संभाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेणे आवश्‍यक आहे,'' असे मत प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी आज व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षातर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त "छत्रपती संभाजीराजे यांचे कार्यकर्तृत्व' या विषयावर डॉ. पठाण यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य टी एस. पाटील अध्यक्षस्थानी होते.

डॉ. पठाण म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व भारतीयांचे राज्य. महाराष्ट्रात निर्माण केलेल्या स्वराज्याची प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी संभाजी महाराज झगडत राहिले. अखेर त्यांना हौतात्म्य पत्कारावे लागले. त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्यासह मराठ्यांनी प्राणपणाने स्वराज्याचे रक्षण केले.''

संभाजी महाराज कर्तृत्ववान होते. संस्कृत पंडित व ग्रंथलेखक होते. संभाजी महाराजांची बदनामी होईल असे काही मथळे चर्चेत आले; पण त्यांची राष्ट्राप्रती असलेली जाज्ज्वल्य निष्ठा, पराक्रमही नव्या पिढीने अभ्यासावा, त्यातून प्रेरणा घ्यावी, असा आहे.'' संभाजी जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. बाबूराव कदम यांनी स्वागत केले. स्वप्नील पाटोळे यांनी आभार मानले.

Web Title: Understand history of Sambhaji Maharaj