बेरोजगारी हेच सर्वात मोठे आव्हान; सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे.

- या यात्रेला जोडूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्याही जनसंवाद यात्रेचेही आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. सुळे यांचीही संवाद यात्रा राज्यातील 15 शहरातून जाणार आहे.

- नगर शहरातून आज सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेस प्रारंभ  झाला. तत्पूर्वी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

नगर : मागील पाच वर्षांतील नोटबंदीसारख्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्र उध्वस्त झाले. पार्ले जी, टाटा मोटर्स सारख्या मोठ्या उद्योगांना याचा फटका बसला आहे. तंत्रज्ञानास आपला विरोध नाहीच. मात्र, नवीन संकल्पना राबवताना आर्थिक क्षेत्रावर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घ्यावेच लागतात. नोटबंदीनंतर देखील करप्शन कमी झाले नाही, हे देशाच्या अर्थमंत्र्यांचे अधिकृत विधान आहे. आर्थिक नीती आणि धोरण दिशाहीन असल्यानेच सध्या बेरोजगारीचे सर्वात मोठे आव्हान देशासमोर निर्माण झाले आहे. राज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या पेक्षा आमची टीम चांगलीच होती, असा निर्वाळा देत सत्तेत बदल करण्यासाठी आवाज उठवणारच, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. दरम्यान, या यात्रेला जोडूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्याही जनसंवाद यात्रेचेही आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. सुळे यांचीही संवाद यात्रा राज्यातील 15 शहरातून जाणार आहे. नगर शहरातून आज सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेस प्रारंभ  झाला. तत्पूर्वी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या निर्मला मालपाणी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड, किसन लोटके आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment is the biggest challenge says Supriya Sule