इचलकरंजी - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हे प्रथमच उद्या (ता. २८) इचलकरंजी दौ-यावर येत आहे. दिवसभर ते शहर व परिसरातील विविध वस्त्रोद्योग संस्था, उद्योगांना भेटी देणार आहेत. तर सांयकाळी प्रमुख वस्त्रोद्योजकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासाठी कोणती मोठी घोषणा करणार काय, याकडे वस्त्रनगरीचे लक्ष लागले आहे.