लॉकडाउनमध्ये कसबे डिग्रज गावातील मुलांचा अनोखा उपक्रम : कागदापासून बनवली 4 हजार पाकीटे 

tung children photo.jpg
tung children photo.jpg
Updated on: 

तुंग (सांगली) -  लॉकडाउनच्या काळाचा अनेकांनी आपापल्यापरीने सदुपयोग केला. कसबेडिग्रज (ता.मिरज) येथील क्‍लब 96 च्यावतीने प्लास्टिकचे वाढते प्रदुषण कमी करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला. मुलांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी "प्लास्टीक हटाव धरती बचाव' आणि "प्लास्टिक टाळा, कागदी पिशव्यांचा वापर करा' हा संदेश देत अनोखी स्पर्धा घेतली. बच्चे कंपनीने रद्दीतील कागदापासुन कागदी पिशव्या तयार करून त्या ग्रामीण भागातील औषध दुकानात मोफत वाटप केल्या. 

अडीच महिन्यात शालेय विद्यार्थी दुरदर्शन, मोबाईल यामुळे खुप कंटाळलेले होते. त्यांना कलाकार्यानुभव अंतर्गत त्यांच्या हस्त कौशल्याला वाव मिळावा. कसबेडिग्रज परिसरातील प्लास्टीकचे वाढते प्रदुषण कमी व्हावे. मोकळ्या वेळेचा सदुपयोग व्हावा, नवोपक्रमाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने क्‍लब 96 च्यावतीने शालेय छोटया छोट्या बालकांना टाकाऊ रद्दीपासून टिकाऊ कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण घर बसल्या देण्यात आले. या प्रशिक्षणात 20 लहान बालकांनी चार दिवसात सुमारे चार हजार कागदी पिशव्या आणि पाकीटे तयार केली. स्वनिर्मितीचा एक वेगळाच आनंद त्यांना मिळाला. 

तयार केलेली पाकीटे कसबेडिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, समडोळी येथील वीस औषध दुकानात क्‍लब 96 चे कार्यकर्ते आणि बालचमूने वाटप केली. कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानाही या बच्चे 
मंडळीनी प्लास्टीकचे प्रदुषण टाळणेसाठी मोफत कागदी पिशव्या, पाकीटे वाटप करण्याचा उपक्रम पालकांच्या नजरेतही भरला. ग्रामस्थांनीही त्यांचे व क्‍लबचे कौतुक केले. सुंदर-सुबक पाकीटे पाहून मेडीकल दुकानदारांनी देखील उपक्रमाचे स्वागत केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna dam water release increased to 2100 cusecs
Sangli farmer loan waiver list 2026
Harshada Jadhav victory in Pune Graduate Constituency
Koyna Dam water allocation dispute
Marathi News Esakal
www.esakal.com