इच्छा नसतानाही नेले आंध्रप्रदेशात; अन् सापडला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

दोन तासांचे काम आहे, तामलवाडी येथे जाऊन यायचे आहे असे सांगून क्‍लिनर काम करणाऱ्या तरुणास घरातून नेले. आंध्रप्रदेशातील नक्कापल्ली येथे नेऊन मारहाण करून त्याचा खून केला. याप्रकरणी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर : दोन तासांचे काम आहे, तामलवाडी येथे जाऊन यायचे आहे असे सांगून क्‍लिनर काम करणाऱ्या तरुणास घरातून नेले. आंध्रप्रदेशातील नक्कापल्ली येथे नेऊन मारहाण करून त्याचा खून केला. याप्रकरणी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

महिबूब शेख (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कचरूद्दीन बांगेरी (वय 52, रा. सोलापूर), तुषार गोपीचंद कोळी (वय 30, रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. 10 मे 2019 ला आरोपींनी महबूब यास इच्छा नसतानाही दोन तासांचे काम आहे, तामलवाडी येथे जाऊन यायचे आहे असे सांगून बळजबरीने घरातून नेले. महिबूब यास आंध्रप्रदेशातील नक्कापल्ली येथे नेवून माहराण केली. त्याचा खून केला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट केला आहे. मृत महिबूबची आई नसीमा सय्यद शेख (वय 58, रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

या घटनेची चौकशी करण्यात आली आहे. महिबूबचा पुलावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्‍त महावीर सकळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unwillinglu youngster was taken Andhra Pradesh and later body was found dead