कुपवाडमध्ये अद्ययावत क्रीडांगण विशेष निधी

Updated playground special fund in Kupwad
Updated playground special fund in Kupwad

कुपवाड : कुपवाडमधून अनेक राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडत आहेत. सध्या सराव करणाऱ्या खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही. याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या माध्यमातून कुपवाडमध्ये अद्ययावत क्रीडांगणासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. 

शिवप्रेमी खो-खो क्‍लब कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. शहरातील सामाजिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य नाव असणाऱ्या नगरसेवक गजानन मगदूम यांच्या शिवप्रेमी मंडळाच्या वतीने खो-खो क्‍लबचा सन्मान सोहळा झाला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, भाजपा नेते मोहन व्हनखंडे, उद्योजक भालचंद्र पाटील, नगरसेवक शेखर माने, नगरसेवक विजय घाडगे, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मोहन जाधव, सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्यासह जिल्हा खो-खो असो.चे पदाधिकारी व खेळाडू आणि पालक उपस्थित होते. 

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले,""नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या खो-खो क्‍लबची कामगिरी कौतुकास्पद आहे. समस्या पाहता केंद्र शासनाच्या "खेलो इंडिया' उपक्रमाद्वारे कुपवाड शहरात अद्ययावत क्रीडांगणासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देतो.'' यशस्वी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अमोल जाधव, तोसिफ मुल्ला, ज्ञानेश्वर तोडकर, महादेव कुभांर, प्रशांत पुजारी या सर्व खेळाडूंनी तो स्वीकारला.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com