esakal | बागणी आरोग्य केंद्रात लशीकरणाला गर्दी; अधिकारी गैरहजर 

बोलून बातमी शोधा

Vaccination crowd at Bagni Health Center; Officer absent

विकेंड लॉकडाऊनलाच बागणी येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याने केंद्रावर एकच गोंधळ उडाला. सकाळी नऊ वाजल्यापासून लस टोचून घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होती.

बागणी आरोग्य केंद्रात लशीकरणाला गर्दी; अधिकारी गैरहजर 
sakal_logo
By
अमोल पवार

बागणी : विकेंड लॉकडाऊनलाच बागणी येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याने केंद्रावर एकच गोंधळ उडाला. सकाळी नऊ वाजल्यापासून लस टोचून घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होती. त्यामुळे लसीकरण केंद्र की कोरोना आजाराला निमत्रंण ? याविषयी भिती व्यक्त केली जात आहे. 

विकेंड लॉकडाऊन दिवसी लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी शेकडो नागरिक आरोग्य केद्रांमध्ये गर्दी करून होते. परंतु सोशल डिस्टन्स पाळा म्हणून सांगणारा एकही कर्मचारी दिसून येत नव्हता. आरोग्य अधिकारीच गैरहजर असल्याने नागरिकांत ना सोशल डिस्टन्स, ना माक्‍स, योग्य नियोजन नसल्याने पुरताच फज्जा उडल्याचे चित्र होते. संबधित अधिकारी गैरहजर असल्याने कामगार, कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका यांच्यामध्ये कोणताही ताळतंत्र नसल्याने याचा नहाक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. शासनाने विकेंड लॉकडाऊन दिवशी अत्यावश्‍यक सेवेसाठी असणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्व अधिकार व कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

या आरोग्य केद्रांच्या अंतर्गत बागणी, शिगाव, काकाचीवाडी, रोझावाडी, फाळकेवाडी, कोरेगाव, ढवळी, भडकंबे आदी गावांचा समावेश आहे. यातील शिगाव, कोरेगाव, भडकंबे या तीन गावांना आरोग्य उपक्रेंद आहेत. केंद्रांचीही अवस्था तर उपकेंद्राची काय अवस्था असा प्रश्न सध्या भागातील नागरिकांना पडला आहे.. 

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासंबंधी तक्रारीवरून आरोग्य केद्रांत जाऊन खात्री केली असता, कोणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवी उत्तरे देण्यात आली. 
- इम्रान शिकलगार, ग्रामपंचायत सदस्य, बागणी 

संपादन : प्रफुल्ल सुतार