इस्लामपुरात गुंठेवारी नियमितीकरणास दुसऱ्यांदा मुदतवाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaibhav Sable Second extension for regularization of Gunthewari in Islampur sangli

इस्लामपुरात गुंठेवारी नियमितीकरणास दुसऱ्यांदा मुदतवाढ!

इस्लामपूर : गुंठेवारी नियमितीकरण करण्यासाठी नागरिकांना आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ तिसऱ्यांदा आणि अंतिम असेल. त्याहीनंतर जे नागरिक आपले प्रस्ताव दाखल करतील, त्यांच्यावर मूळ शासकीय रकमेच्या दहा टक्के जादा आकारणी केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांनी सात जूनपूर्वी पालिकेला प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ते म्हणाले, "पालिकेकडे सध्या १२०० गुंठे क्षेत्राचे प्राथमिक प्रस्ताव दाखल झाले आहेत पालिकेकडून एकूण १५०० नागरिकांनी अर्ज नेलेले आहेत. सुमारे २५ हजार गुंठे क्षेत्र नियमितीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या प्रक्रियेबद्दल लोकांना शंका असल्यास त्यांनी प्रशासनाशी संवाद साधावा. प्रशासनाच्यामार्फत आम्ही रोज सायंकाळी शहरातील विविध विभागांना भेटी देऊन गुंठेवारी नियमितीकरण करून घेण्याबाबत प्रबोधन करणार आहोत. तशी महितीपत्रके तयार केली आहेत, ती घरोघरी वाटणार आहोत."

वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार!

ते म्हणाले, "नगरपालिकेच्या हद्दीतील काही वस्त्यांना बोलीभाषेत जातीवाचक संबोधले जात आहे. अशा वस्त्यांना थोर समाजसुधारक, महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेणार आहोत. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागामार्फत तसा एक ठराव झाला आहे, त्याच्याधारे ही नावे बदलणार आहोत. नव्याने ठेवण्यात येणार्‍या नावाबद्दल नागरिकांना काही हरकती असल्यास त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा.

जुनी नावे व संभाव्य सुधारित नावे पुढीलप्रमाणे- चांभार कॉलनी - संत रोहिदास नगर,धनगर गल्ली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, लोणार गल्ली ' यशवंतराव चव्हाण नगर, माळी गल्ली - संत सावता नगर, कुंभार गल्ली - संत चोखामेळा नगर, शिंपी गल्ली- संत नामदेव नगर, रामोशी गल्ली - क्रांतिवीर उमाजी नाईक नगर, भुई गल्ली - संत भिमानगर, खाटीक गल्ली - डॉ. एपीजे अब्दुल कलाम नगर, वडर गल्ली - बजरंग नगर किंवा विश्वकर्मा नगर, डवरी गल्ली- काल भैरवनाथ नगर, कैकाडी गल्ली - संत राजाराम महाराज नगर, डोंबारी गल्ली- डॉ. किशोर काळे नगर, नाथगोसावी गल्ली - कानिफनाथ नगर, डवरी गल्ली - नवनाथ नगर, माळी गल्ली - महात्मा ज्योतिबा फुले नगर, कोळी मळा - वाल्मिकी नगर, बुरुड गल्ली - केतेश्वर नगर, गवळी गल्ली- श्रीकृष्ण नगर, नाथगोसावी गल्ली - कानिफनाथ नगर, माळी गल्ली - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर, महार वाडा - संत बसवेश्वर नगर, माकडवाले वस्ती - श्रीनाथ नगर अशा पद्धतीने नामकरण केले जाणार आहे. नागरिकांनी आपले आक्षेप पालिका प्रशासनाकडे नोंदवल्यास निर्णय घेणे सोपे जाईल."

Web Title: Vaibhav Sable Second Extension For Regularization Of Gunthewari In Islampur Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top