वाळवा तालुक्‍यात 21 गावांची 6 कोटीवर पाणीपट्टी थकीत 

In Valva taluka, water supply to 21 villages is exhausted at 6 crore
In Valva taluka, water supply to 21 villages is exhausted at 6 crore
Updated on

इस्लामपूर : वाळवा तालुक्‍यातील 21 गावांची सुमारे 6 कोटी 26 लाख 58 हजार 758 रुपयांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा पाणीपट्टी वसुली थकली आहे. ही वसुली वाळवा पंचायत समिती प्रशासनासाठी डोकेदुखी बनली असून ती तात्काळ वसुल व्हावी यासाठी प्रशासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा प्रशासनानेही यात लक्ष घातले असून वसुलीची मोहीम गतीमान करण्यावर भर देण्यात येत आहे. हा कर थकल्याने विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीवर परिणाम झाला असून कामेही रखडली आहेत. 

गेल्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण अर्थकारण थंडावले. कोरोनाच्या गंभीर प्रश्‍नासमोर फक्त त्यावरच्या उपाययोजना हाच एकमेव पर्याय प्रशासनासमोर होता. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर प्रशासनाने रोजच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वाळवा तालुक्‍यात जवळपास शंभर गावे आहेत. त्यातील 21 गावांची पाणीपट्टी वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे. बागणी, शिगाव, रोझावाडी, काकाचीवाडी, कामेरी, कासेगाव, कापूसखेड या गावांना स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना आहेत. त्यामुळे त्यांचा या थकबाकीत समावेश नाही. थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या गावांमध्ये पेठ, कासेगाव, नेर्ले, जुनेखेड, नवेखेड या गावांचा समावेश आहे. 

गावनिहाय पाणीपट्टी वसुलीचे आकडे पुढील प्रमाणे ः पेठ - 1 कोटी 69 लाख 13 हजार 437, कासेगाव - 41 लाख 24 हजार 247, नेर्ले - 1 कोटी 18 लाख 53 हजार, जुनेखेड - 13 लाख 44 हजार 556, नवेखेड - 24 लाख 70 हजार 800, बागणी - 8 लाख 4 हजार 559, शिगाव - 25 लाख 26 हजार 192, रोझावाडी - 2 लाख 28 हजार 982, काकाचीवाडी - 2 लाख 58 हजार 251, तांबवे - 15 लाख 1 हजार 558, येवलेवाडी - 8 लाख 5 हजार 504, धोत्रेवाडी - 3 लाख, 86 हजार 904, कापूसखेड - 7 लाख 13 हजार 867, केदारवाडी - 19 लाख 41 हजार 835, काळमवाडी - 85 लाख 4 हजार 895, वाटेगाव - 30 लाख 32 हजार 468, शेणे - 8 लाख 48 हजार 656, कामेरी - 25 लाख 80 हजार 983, विठ्ठलवाडी - 5 लाख 37 हजार 915, वाघवाडी - 9 लाख 69 हजार 267, जांभूळवाडी - 3 लाख 10 हजार 875 

ग्रामपंचायतींकडील थकबाकी वसुल करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. संबंधीत गावांच्या ग्रामसेवकांना योग्य त्या सुचना दिल्या असून पाठपुरावा सरु आहे. कोरोना संसर्गाची भिती अद्यापही असली तरीही त्यावर मात करुन वसुलीला प्राधान्य दिले जाईल. कारण थकबाकी वसुल झाल्याशिवाय या रकमांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागणार नाहीत. 
- शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com