वाळवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणचा प्रारुप आज प्रसिध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणचा प्रारुप

वाळवा : ZP-पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी गट व गणचा प्रारुप मसुदा आज प्रसिध्द करण्यात आला. यात वाळवा तालुक्यात १ जिल्हा परिषद गट व २ पंचायत समिती गणाची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे १२ गट व पंचायत समितीचे २४ गण झाले आहेत. नवीन गट व गणाच्या वाढीमुळे जुन्या गट व गणातील गावे इतरत्र विस्कळीत झाल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी तयारी केलेल्या बहुतांशी नेत्यांची पंचाईत होणार आहे.

आज येथील तहसील कार्यालयात आज ही यादी प्रसिध्द करण्यात आली. या यादीनुसार जिल्हा परिषदेचा जुन्या येलूर गटाचे चिकुर्डे गटात तर कामेरी गटाचा पेठ गटात समावेश झाला आहे. तर नेर्ले व बहादूरवाडी असे नवीन जिल्हा परिषदेचे गट तयार झाले आहेत. पंचायत समितीत वाळवा गावात वाळवा १ व वाळवा २ असे दोन गण तर तांबवे, येडेनिपाणी व कोरेगाव हे नवीन गण तयार झाले आहेत.

जिल्हा परिषद गट व त्यामध्ये समाविष्ट गावांची नावे अशी ः १) रेठरेहरणाक्ष -किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, बेरडमाची, कोळे, शिरटे, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, बिचूद, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र. २) बोरगाव - ताकारी, दुधारी, गौंडवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, बोरगाव, नरसिंहपूर, खरातवाडी, बहे, फार्णेवाडी (बो). ३) नेर्ले - साखराळे, हुबालवाडी, कापूसखेड, नेर्ले. ४) कासेगाव - तांबवे, येवलेवाडी, काळमवाडी, शेणे, केदारवाडी, कासेगाव, धोत्रेवाडी. ५) वाटेगाव - भाटवाडी, वाटेगाव, सुरुल, माणिकवाडी, घबकवाडी, जांभूळवाडी, ओझर्डे, रेठरेधरण, मरळनाथपूर. ६) पेठ - पेठ, महादेववाडी, नायकलवाडी, वाघवाडी, विठ्ठलवाडी, कामेरी, तुजारपूर, गाताडवाडी. ७) वाळवा - मसूचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, शिरगाव. ८) बावची - अहिरवाडी, बावची, पडवळवाडी, गोटखिंडी, इटकरे, येडेनिपाणी. ९) कुरळप - कुरळप, लाडेगाव, वशी, जक्राईवाडी, शिवपुरी, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, ढगेवाडी, कार्वे, करंजवडे, डोंगरवाडी, ठाणापुडे. १०) चिकुर्डे - चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, येलूर, तांदूळवाडी. ११) बहादूरवाडी - कणेगाव, भरतवाडी, बहादूरवाडी, भडकंबे, मालेवाडी, कोरेगाव, ढवळी, फार्णेवाडी (शि), फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी. १२) बागणी - बागणी, शिगाव, काकाचीवाडी, रोझावाडी, मर्दवाडी, कारंदवाडी, मिरजवाडी.

पंचायत समिती गण व त्यामध्ये समाविष्ट गावांची नावे अशी

१) किल्लेमच्छिंद्रगड - किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, बेरडमाची, कोळे, शिरटे, येडेमच्छिंद्र (प्रभाग क्र.१ व २) २) रेठरेहरणाक्ष - भवानीनगर, बिचूद, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र (प्रभाग क्र.३,४,५) ३) ताकारी - ताकारी, दुधारी, गौंडवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, बोरगाव (प्रभाग क्र.४,५,६). ४) बोरगाव - बहे, फार्णेवाडी, बोरगाव (प्रभाग क्र. १, २, ३), ५) साखराळे - साखराळे, हुबालवाडी, कापूसखेड (प्रभाग १ व ५) ६) नेर्ले - नेर्ले, कापूसखेड (प्रभाग क्र.२,३,४) ७) तांबवे - तांबवे, येवलेवाडी, काळमवाडी, शेणे, केदारवाडी. ८) कासेगाव - कासेगाव, धोत्रेवाडी ९) वाटेगाव - भाटवाडी, वाटेगाव, सुरुल. १०) रेठरेधरण - माणिकवाडी, घबकवाडी, जांभूळवाडी, रेठरेधरण, मरळनाथपूर. ११) पेठ - पेठ, महादेववाडी, नायकलवाडी, वाघवाडी. १२) कामेरी - विठ्ठलवाडी, कामेरी, तुजारपूर, गाताडवाडी. १३) वाळवा १ - मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा (प्रभाग क्र. २ व ३), १४) वाळवा २ - शिरगाव, वाळवा (प्रभाग क्र. १, ४. ५, ६). १५) बावची

अहिरवाडी, बावची, पडवळवाडी, गोटखिंडी (प्रभाग क्र.५ व ६), १६) येडेनिपाणी - इटकरे, येडेनिपाणी, गोटखिंडी (प्रभाग क्र. १, २, ३, ४). १७) कुरळप - कुरळप, लाडेगाव, वशी, जक्राईवाडी, शिवपुरी. १८) ऐतवडे बुद्रुक - ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, ढगेवाडी, कार्वे, करंजवडे, डोंगरवाडी, ठाणापुडे. १९) चिकुर्डे - चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे खुर्द (प्रभाग १, २, ३,४). २०) येलूर - कुंडलवाडी, येलूर, कोनोली वसाहत, ऐतवडे खुर्द (प्रभाग ५), तांदूळवाडी. २१) बहादूरवाडी - कणेगाव, भरतवाडी, बहादूरवाडी, भडकंबे, मालेवाडी. २२) कोरेगाव - कोरेगाव, ढवळी, फार्णेवाडी (शि), फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी. २३) बागणी - बागणी, शिगाव. २४) कारंदवाडी - काकाचीवाडी, रोझावाडी, मर्दवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मिरजवाडी.

Web Title: Valva Zilla Parishad And Panchayat Samiti Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top