

Vanchit Bahujan Aghadi Alliance
sakal
सांगली : ‘‘वंचित बहुजन आघाडी कॉँग्रेस सोबत जाण्यासाठी तयार आहे. कॉँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. ऐनवेळी कुणाशीच आघाडी झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे २१ उमेदवार रिंगणात असतील,’’ अशी माहिती राज्य उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी दिली.