मिरज : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचे अधिकार जिल्हा कमिटीला दिले आहेत. याबाबत नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली आहे. पक्षाची जिल्हा कार्यकारणी भाजप वगळून इतर पक्षाबरोबर आघाडीबाबतचा प्रस्ताव राज्य कार्यकारणीस पाठवू शकते, अशी भूमिका नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी मांडली आहे.