
किल्लेमच्छिंद्रगड : पारंपारिक शेतीमध्ये यांत्रिक शेतीचे अतिक्रमण अनेक उपयुक्त शेती उत्पादनांना मागे टाकणारे ठरत आहे. बैलाच्या भरड्यासाठीचा काळा हुलगा आणि शेतकऱ्यांच्या माडग्यासाठीचा तांबडा हुलगा हे त्यातले एक उदाहरण. कधीकाळी सुबत्तेचे प्रतिक असलेला हा हुलगा आज तालुक्यातूनच नाहीतर संपूर्ण सांगली जिल्ह्यातून नामशेष होऊन हद्दपार झाला आहे. औषधासाठीही उरलेला नाही.