एकरकमी कर्ज परतफेड योजनेमुळे १२५ कोटी थकीत कर्जांपैकी जास्तीत जास्त कर्जाची वसुली होऊन १२५ कोटींच्या ठेवी परत करावयाच्या आहेत.
सांगली : येथील अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेच्या (Vasantdada Farmers Cooperative Bank) कर्जदारांसाठी राज्य शासनाने एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना लागू केली आहे. २६ फेब्रुवारी २०२५ पूर्वी थकबाकी भरून लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंक अवसायक जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. वसंतदादा शेतकरी बॅंकेची १२५ कोटींची कर्ज थकबाकी असून त्याचदरम्यान ठेवीही परत करावयाच्या आहेत.