"वसंतदादा'चा कोविड रुग्णालयासाठी प्रस्ताव : अध्यक्ष विशाल पाटील...वसंत बझारमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल उभारणार 

बलराज पवार
Tuesday, 11 August 2020

सांगली- कोविड रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु असताना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याने 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला आहे. सदरचे रुग्णालय महापालिकेने चालवावे किंवा आम्ही चालवण्यास तयार आहोत. तसा प्रस्ताव महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. 

सांगली- कोविड रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु असताना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याने 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला आहे. सदरचे रुग्णालय महापालिकेने चालवावे किंवा आम्ही चालवण्यास तयार आहोत. तसा प्रस्ताव महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. 

अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या जागेवर तातडीने हे हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे. कोरोनाचे मोठे संकट आपल्या सगळ्यांसमोर आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यांच्यावर उपचाराची सोय होणे आवश्‍यक आहे. शासनाच्या यंत्रणेला कोरोनाशी लढताना काही मर्यादा येत आहेत. वसंतदादा कुटुंब नेहमीच जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहिले आहे. कारखान्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे यापूर्वी केलेली आहेत. 

ते म्हणाले, कोरोनाच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात वसंतदादा कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन करुन ते अनेक गावांमध्ये मोफत वाटप केले होते. नंतर ते अल्पदरात नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांना आयसोलेशन व क्वारंटाईनसाठी कारखान्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता जिल्ह्यात तसेच सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावर वसंत बझार इमारतीमध्ये तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे. यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना तसा प्रस्ताव दिला आहे. तर सभासदांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

शरद पवार यांच्या आवाहनास प्रतिसाद 
खासदार शरद पवार यांनी कालच (रविवारी) राज्यातील साखर कारखान्यांना तातडीने कोविड हॉस्पीटल उभा करण्याचे आवाहन केले होते. कारखान्यांनी कोविड हॉस्पिटल उभारुन प्रशासनाला चालवण्यास द्यावे असे आवाहन केल्यानंतर आज वसंतदादा कारखान्याने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल उभारण्याची तयारी दर्शवली आहे. 

महापालिका आयुक्त कापडणीस यांनी आजच जागेची पाहणी केली. महापालिकेस हे हॉस्पिटल मोफत चालवण्यास देण्याची तयारी आहे. शासनामार्फत हे रुग्णालय चालवावे किंवा त्यांची अडचण असल्यास आम्हीही हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली आहे. ऑक्‍सिजन पुरवठ्यासहीत हे कोविड रुग्णालय करण्याचा आमचा प्रस्ताव असून तो तातडीने मंजूर केल्यास रुग्णांची चांगली सोय होईल. कोरोना रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा अल्पदरात मिळावी अशी कारखान्याच्या सभासदांची इच्छा आहे. - 
-विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना 

 

संपादन-  घनश्‍याम नवाथे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasantdada's proposal for Kovid Hospital: President Vishal Patil ... 100-bed hospital to be set up in Vasant Bazar