
सांगली : जिल्ह्यातील वाहन संख्या वाढीचा वेग गेल्या दहा वर्षांपासून वाढत आहे. रोज 150 नवी वाहने रस्त्यांवरून धावत आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येची तुलना करता नऊ वर्षांपूर्वी सहा व्यक्तींमागे एक वाहन असे प्रमाण होते. सध्या लोकसंख्या 30 लाखांहून अधिक आहे; तर वाहनसंख्येनेही दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे तुलना करता तीन व्यक्तींमागे एक वाहन असे प्रमाण आहे.
गेल्या 20 वर्षांपासून वाहनांची संख्या वाढतच आहे. 20 ते 25 वर्षांपूर्वीचे चित्र पाहिले, तर महाविद्यालय परिसर असो, की एखादी कंपनी, कारखाना परिसर असो, तेथे सायकली लावण्यासाठी स्टॅंड असायचे. परंतु या सायकल स्टॅंडची जागा सध्या दुचाकींनी घेतल्याचे चित्र कॉलेज, कंपनी, कारखाने आदी परिसरात पहायला मिळते. 20 वर्षांपूर्वी दारात दुचाकी म्हणजे स्टेटस्चा विषय असायचा, तसेच दुचाकीसाठी बॅंका, अर्थसहाय्य कंपन्यांचे कर्ज मिळवणे म्हणजे दिव्यच असे. परंतु लोकांची मागणी आणि बॅंका, अर्थसहाय्य कंपन्यांची गरज लक्षात घेऊन त्यात गेल्या काही वर्षांत सुटसुटीतणा आला आहे. वाहनांसाठी सहज कर्ज मिळू लागल्यामुळे अनेकांच्या दारात सध्या दुचाकी पाहायला मिळतात. तोच प्रकार रिक्षा, मालवाहतूक गाड्या, ट्रॅक्टर, ट्रक आदी गाड्यांच्या बाबतीत दिसतो.
जिल्ह्यातील अपवाद वगळता रस्त्यांची अवस्था तीच आहे. रूंदीकरण फारसे झाले नाही. मात्र या रस्त्यांवरून धावणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्यांची संख्या वाढली आहे. अनेक रस्त्यांवर दिवसभर ट्रॅफिक जामचा अनुभव येतो. नऊ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या 5 लाख 20 हजार होती. सध्या वाहनसंख्येने दहा लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. तुलनाच केली, तर नऊ वर्षात वाहनसंख्या दुपटीने वाढली. सहा व्यक्तींमागे एक वाहन हे प्रमाण आता तीन व्यक्तींमागे एक वाहन असे बनले आहे.
दुचाकी संख्या साडेसात लाखांवर
जिल्ह्यातील वाहन संख्येत सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. डिसेंबर 2020 अखेर दुचाकींची संख्या 7 लाख 54 हजार 213 होती. गेल्या अडीच महिन्यात त्यात आणखी भर पडली आहे.
दुचाकींची संख्या
मोटारींचा वेग जास्त
वाहनसंख्या वाढीचा विचार केला, तर सर्वाधिक मोटारसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. नऊ वर्षांपूर्वी 36 हजार 791 इतक्या मोटारी होत्या. सध्या डिसेंबर अखेर 97 हजार 328 मोटारी झाल्या आहेत. तुलनाच केली, तर अडीच ते पावणे तीन पटीने मोटारी वाढल्या आहेत. दुचाकीपेक्षा मोटार दारात असणे स्टेटस्चा विषय बनला आहे.
जिल्ह्यातील वाहनांची संख्या
वाहनांचा प्रकार | 31 मार्च 2012 अखेर | 31 डिसेंबर 2020 अखेर |
दुचाकी वाहने | 3,99,630 | 754213 |
मोटार | 36,791 | 97328 |
जीप | 15,219 | 22946 |
स्टेशन वॅगन | 352 | 352 |
टॅक्सी कॅब्स | 881 | 496 |
मीटर फिटेड | 474 | 505 |
टुरिस्ट कॅब्स | 344 | 1451 |
ऑटो रिक्षा | 7528 | 10540 |
स्टेज कॅरेज | 870 | 870 |
मिनी बस | 43 | 149 |
स्कूल बस | 114 | 615 |
खासगी सर्व्हिस वाहने | 39 | 85 |
ऍम्ब्युलन्स | 154 | 236 |
बहुउद्देशीय वाहने | 86 | 222 |
ट्रक्स आणि लॉरीज | 7856 | 11118 |
टॅंकर | 599 | 901 |
डिलिव्हरी व्हॅन चारचाकी | 9979 | 24253 |
डिलिव्हरी व्हॅन तीनचाकी | 5943 | 8132 |
ट्रॅक्टर | 18,035 | 43284 |
ट्रेलर | 15,293 | 20464 |
इतर | 671 | 1269 |
एकूण | 5,20,901 | 999429 |
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.